सामूहिक वन व्यवस्थापन (सावव्य/Community Forest Management) हा गावातील वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी ग्रामसभा व स्थानिक समुदाय यांच्या सहभागातून राबविला जाणारा महत्वाचा उपक्रम आहे. या माध्यमातून वनसंपत्तीचे रक्षण, जैवविविधतेचा वाढ, तसेच गावाच्या आर्थिक विकासास मदत मिळते.
वनक्षेत्राचे संरक्षण व संवर्धन ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून करणे.
वनाधारित उपजीविकेला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे.
जैवविविधता वाढवणे आणि पर्यावरणीय समतोल राखणे.
अनधिकृत वृक्षतोड, अतिक्रमण व वननाश रोखणे.
वनव्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेत ग्रामसभेचा सहभाग वाढवणे.
वनक्षेत्रात वृक्षारोपण, पुनर्वनीकरण व गवत/वनौषधींचे संवर्धन.
वनक्षेत्राच्या देखरेखीकरिता समितीद्वारे संयुक्त गस्त व निरीक्षण.
लाकूड, बांबू, इंधन, चारापूरवठा इत्यादींचा नियंत्रित व नियोजित वापर.
वनातील नैसर्गिक संपत्तीचा शाश्वत वापर करण्यासाठी ग्रामसभेने ठरविलेल्या नियमांचे पालन.
वनाधारित रोजगार निर्मितीसाठी उपक्रम राबविणे.
सामूहिक वन व्यवस्थापनासाठी गावात विशेष समिती गठीत केली जाते. यामध्ये:
सरपंच/उपसरपंच – अध्यक्ष
ग्रामसेवक – सचिव
वनक्षेत्र अधिकारी / बीट गार्ड – मार्गदर्शक
स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी (आवश्यकतेनुसार)
महिला बचत गट प्रतिनिधी
तरुण मंडळ सदस्य
ग्रामस्थांचे प्रतिनिधी
वनसंवर्धनात स्थानिक समुदायाचा सहभाग वाढतो.
नैसर्गिक संसाधनांचा समतोल राखून पर्यावरण संरक्षणास हातभार.
वनाधारित उत्पन्नात वाढ होऊन ग्रामस्थांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा.
गावात शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल.